Investment News : शेअर बाजारात थेट स्टॉक्सनं खरेदी करता गुंतवणूकदारांकडून Mutual Fund मध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात.
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांसोबत नव्या पर्यायांचा विचार गेल्या काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतो. पारंपरिकपणे पोस्ट, बँकांतील मुदत ठेवी, रिकरिंग ठेव आणि एलआयसीमध्ये गुंतवणुकीकडे लोकांचा कल असायचा आता तंत्रज्ञानामुळं अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. म्यूचुअल फंडात गुंतवणूक करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहयला मिळतेय.
म्यूचुअल फंडातील गुंतवणूक तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून अवघ्या 100 ते 200 रुपयांपासून सुरु करु शकतात. या फंडात गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून गुंतवणूकदार कोट्याधीश होतो.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI Healthcare Opportunities Fund मध्ये 2500 रुपयांची एसआयपी ज्यांनी केली होती ते करोडपती झाले असते. “हा फंड जवळपास 25 वर्ष जना आहे.” For example, 18 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या एक वर्षात या फंडामधून गुंतवणूकदारय 37 टक्के परतावा मिळाला आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे याचा रिस्कोमीटर उच्च आहे. म्हणजे या फंडाचा समावेश अतिधोका अशा प्रवर्गात होतो. हा फंड 5 जुलै 1999 ला लाँच झाला होता. तेव्हापासून या फंडानं गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. विशेष म्हणजे या फंडात जमा झालेली रक्कम आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. आरोग्य क्षेत्रात या फंडाची गुंतवणूक 93.23 टक्के होती. हेल्थकेअरशिवाय केमिकल्समध्ये 3.50 टक्के गुंतवणूक आहे. हा फंड लाँच झाल्यानंतर आतापर्यंत गुंतवणूकदारांना 18.27 टक्के रिटर्न दरवर्षी दिला आहे. एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी 2500 रुपयांची एसआयपी केली असती. दरमहा 2500 रुपये जमा केले असते तर एखाद्या व्यक्तीच्या नावे 1.18 कोटी रुपयांचा फंड निर्माण झाला असता. म्हणजेच तुम्ही 25 वर्षे 2500 रुपयांच्या एसआयपीनं 7.50 लाख रुपये जमा केले असते व्याजाच्या रुपात मिळालेली रक्कम मिळून 1.10 कोटी रुपये मिळाले असते. मात्र, यासाठी 25 वर्ष एसआयपी सुरु ठेवणं आवश्यक होतं. या म्यूचुअल फंडात गुंतवणूक लमसम म्हणजेच एकाच वेळी ठेव ठेवणाऱ्यांना देखील चांगला परतावा मिळाला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं फंड सुरु झाला तेव्हा 1 लाख रुपये गुंतवले असते तर 25 वर्षात त्याची किंमत 55 लाख रुपये झाले असते.
इतर बातम्या :
3 महिन्यांत पैसे दुप्पट! ‘या’ कंपनीने एका शेअरवर एक शेअर दिला बोनस, गुंतवणूकदार मालामाल (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Posted inBusiness